
कोल्हापूर : दि. 31,
माय भारत केंद्र व सायबर महाविद्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेरा युवा भारत अंतर्गत नशा मुक्त अभियानांतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा .डॉ आर. के. कामत यांनी वरील उद्गार काढले .भारतामध्ये युवकांची संख्या सगळ्यात जास्त असल्याकारणाने युवकांनी आपल्या आयुष्य विविध उपक्रमांमध्ये व्यतीत करणे गरजेचे आहे समाजातील सर्वच घटकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते परंतु अशा समस्यांना घाबरून निराश न होता किंवा विविध जाहिरातींच्या प्रलोभनांना बळी न पडता व्यसनांच्या आहारी न जाण्याचे आवाहन त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी बोलताना कोल्हापूर विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांनी नशा या दोन प्रकारचे असतात पण युवकांनी चांगल्या प्रकारच्या नशा कराव्यात जसे की अभ्यास संस्कार ,वाचन, मनन ,चिंतन जेणेकरून ते आयुष्यात यशस्वी होऊ शकतील.
या एकदिवसीय जिल्हास्तरीय कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध कॉलेजमधील सुमारे 167 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला .यामध्ये पथनाट्य ,चित्रकला, गायन ,काव्य ,वादविवाद ,नृत्य, रिल्स, घोषवाक्य इत्यादी आठ प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. यातील प्रत्येक स्पर्धेमधून तीन विजेत्यांना प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यातील प्रत्येक स्पर्धेतील विजेता हा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणार असून याची अंतिम फेरी राष्ट्रीय स्तरावरती संपन्न होणार आहे.
सायबर चे संचालक डॉ.आर .के .टेलर, सायबर संचलित महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर .जी .कुलकर्णी, डॉ. टी व्ही .जी शर्मा अधिष्ठाता समाजकार्य विभाग, प्रशासकीय अधिकारी डॉ. विनायक साळोखे, डॉ. दुर्गेश वळवी, डॉ.प्रीती गरगटे यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले .दुपारच्या सत्रात कर्नल विक्रम नलवडे यांनी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध आयुष्य जगण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालनप्रा.पूनम माने यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. दीपक भोसले व आभार प्रदर्शन प्रा.महेंद्र जनवाडे यांनी केले .कार्यक्रमास माय भारत केंद्राचे जिल्हा समन्वयक स्वप्निल देशमुख, सहव्यवस्थापक गणेश भोसले, निलेश कांबळे, डॉ.सुरेश आपटे, डॉ. कालिंदी रानभारे यांचे सहकार्य लाभले तर परीक्षक म्हणून किर्लोस्कर कंपनीचे सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद अजगेकर,सी.पी.आर हॉस्पिटलचे वरिष्ठ समुपदेशक मकरंद चौधरी ,लक्ष्मी फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक देसाई ,प्रा. प्रियांका साळोखे ए. आर.पी कन्या कॉलेज इचलकरंजी यांनी काम पाहिले तर प्रा. शिवानी गावडे ,प्रा.संध्या तळेकर ,प्रा.वसीम सय्यद ,विद्यार्थी प्रतिनिधींचे सहकार्य लाभले








