
राधानगरी :
धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरण काल पूर्णपणे भरलेले आहे. 7 स्वयंचलित दरवाजा पैकी कोणताही दरवाजा कधीही उघडण्याची शक्यता होती. काल रात्री 11:40 वाजता धरणाचा 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला गेला असून या दरवाजातून भोगावती नदी पात्रामध्ये 1528 क्यूसेस व पॉवर हाऊस मधून 1400 पक्युसेस असा 2800 क्युसेस इतका विसर्ग सध्या सुरू झालेला असून, धरण क्षेत्रात वारा व पाऊस सतत राहिल्यास आणखी एक स्वयंचालित दरवाजा आज दिवसभरात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








