
कोल्हापूर,
सुसंस्कार हायस्कूल भोसलेवाडी, कोल्हापूर येथे पर्यावरणाचे संवर्धन व वृक्षाचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने अली फादर अँड सन्स फाउंडेशन भरारी सामाजिक संस्थां कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘झाडे लावा पर्यावरण वाचवा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने एम्प्लॉयी व्हॅलेंटेरिंग प्रोग्रॅम उपक्रम आयोजित करण्यात आला.
जांभूळ,फणस,अशोक,निम,पिंपळ,चिंच या प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली.लावलेल्या झाडाची नियमित देखभाल व संगोपन करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड अत्यंत आवश्यक असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘एक व्यक्ती एक झाड’ हा संदेश देत नागरिकांनी वृक्ष लागवड करुन पर्यावरणाच्या रक्षणात योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले.या उपक्रमामुळे परिसर हिरवागार करण्याबरोबरच पर्यावरणाचा संवर्धनाचा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचवला.
या कार्यक्रमाला जेसीम अली,नीतु कलीता यांचे सहकार्य लाभले.भरारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिपक नाईक यांनी संस्थे विषयी माहिती व झाडांचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारची 50 झाडे लावण्यात आली.त्याचबरोबर सोमनाथ पाटील आणि टीम,एस.एम.आय.सी.सी.टीम, विशाल मिरजकर,रोहित पाटील, विजय भोगण यांचे सहकार्य लाभले.शाळेतील शिक्षक व विध्यार्थी यांचे सहकार्य लाभले.








