
भोगावती : दि. 3
केंद्रशाळा कौलव ता. राधानगरी येथे 2026 ते 28 या कालावधीसाठी शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठित करण्यासाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. नवनियुक्त सदस्यांमधून अध्यक्षपदी भगवान पांडुरंग पाटील यांची तर उपाध्यक्षपदी अभिजित भिकाजी पाटील यांची निवड करण्यात आली.
पालकांच्या वतीने साक्षी अतुल पाटील,प्रवीण मारुती हुजरे,जयश्री विनायक चरापले,पूजा प्रदीप पाटील,उदय दगडू कांबळे,संगीता सुरेश कलिकते,रंगराव सखाराम पाटील यांची सदस्य निवड करण्यात आली.

सरपंच एकनाथ कुंभार,तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रा. विश्वास पाटील,पोलीस पाटील डी एस कांबळे,ग्रामपंचायत सदस्य,रणजित पाटील(चाचा),अजित पाटील ,संदीप चरापले,सुरज पाटील,उज्वला पाटील,शहाजी पाटील,दशरथ कांबळे स्वप्निल पाटील,माजी अध्यक्ष शांताराम पाटील,उपाध्यक्ष अनिता कांबळे, सदस्य विशाल बनछोडे,दिलीप यादव,सागर पाटील,अमृता पाटील,शिल्पा पाटील,संगीता पाटील,अशोक पाटील, यांच्यासह पालक उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक केंद्रप्रमुख आर.जी.पाटील यांनी केले. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
आरोग्य, शिक्षण व पर्यावरणाबरोबर विध्यार्थी हिताच्या अनेक योजना राबवून,माझी शाळा – प्लास्टिकमुक्त शाळा , पर्यावरणपूरक शाळा हे उपक्रम राबविण्यात येतील.विध्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेचा पाया रचण्यासाठी योजना आखून कला, साहित्य, क्रीडा क्षेत्रात सुद्धा शाळेचा लौकिक वाढविण्याचा मानस असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष भगवान पाटील यांनी सांगितले.








