
कोल्हापूर :
प्रतिनिधी,
प्रती पंढरपूर म्हणून समजले जाणारे नंदवाळ ता.करवीर या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त भक्तीचा महापूर आला . पहाटेपासूनच विठ्ठल भक्तांचे लोंढे नंदवाळच्या दिशेने जात होते.जिल्ह्याच्या विविध भागातून व गावागावातून वारकरी दिंड्यांचे आगमन नंदवाळ येथे होत होते. सारा परिसर भक्ती सागरात व टाळ मृदंग आणि नामघोशात नाहून निघाला होता.
गर्जन ता. करवीर येथून ज्योतिर्लिंग भजनी मंडळ, ग्रामस्थ व तरुण मंडळांच्या वतीने गर्जन ते नंदवाळ पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीमध्ये गावातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला.टाळ, मृदंगाच्या निनादात निघालेली ही दिंडी दुपारी नंदवाळमध्ये पोहोचली. वाटेत विविध ठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले. लक्ष्मी फौंडेशनचे अध्यक्ष विनायक देसाई यांच्यावतीने शिरोली दु. येथील बलभीम विकास संस्थेचे चेअरमन राहुल पाटील, समाधान पाटील यांच्या हस्ते खिचडी वाटप करण्यात आले. कृष्णात सावंत व एकनाथ चव्हाण यांनी चहा व लाडू वाटप केले. मांडरे येथे अनिल गवळी, भिकाजी आर्डे, परसू सावंत,मारुती सावंत,यांनी केळी व लाडू वाटप केले. सडोली खा. येथे अमर साळोखे व परिवार यांच्यावतीने फराळ वाटप करण्यात आला. कांडगाव येथे रणजीत नाईक व विशाल देसाई यांच्यावतीने खिचडी व ताक वाटप करण्यात आले. या दिंडीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.प्रारंभी ह.भ.प. रघुनाथ देसाई व सुभद्रा देसाई या दापत्यांच्या हस्ते विना पूजन करण्यात आले.ह.भ. प. महादेव रघुनाथ देसाई यांच्या पुढाकाराने व ह. प. प.नाथाजी चव्हाण, बाळू नाईक,ह. भ.प. सुर्यकांत देसाई,संजय नाईक यांच्या सहकार्याने दिंडीस सुरुवात झाली. ह. भ. प. चंद्रकांत शंकर नाईक, ह. भ. प.विलास पाटील, ह. भ. प.कृष्णात गुरव, ह. भ. प. व्यंकट चव्हाण, ह. भ. प. रामचंद्र नाईक, माजी सरपंच दादू नाईक, विनायक देसाई, नारायण पाटील,उत्तम चव्हाण,ह. भ. प.कृष्णात चव्हाण, निवृत्ती चव्हाण,उमेश चव्हाण,विष्णू सावंत, आनंदा नाईक, ह. भ. प.विनोद चव्हाण, बाळू सावंत, सागर कोपर्डे, विकी देसाई यांच्यासह महिला व पुरुष दिंडीमध्ये सामील झालेले होते.








