
वारणानगर / प्रतिनिधी, दि. १२ :
यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर येथील एनसीसी विभागाच्या कॅडेट्सनी ‘टीबी मुक्त भारत’ अभियान व आंतरराष्ट्रीय युवा दिननाचे औचित्य साधून रॅली काढून क्षयरोग आणि एच.आय.व्ही./ एड्स विषयी जनजागृती केली.
कॅडेट्सनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत टीबीची लक्षणे, वेळेवर तपासणीचे महत्त्व तसेच उपलब्ध मोफत उपचार सुविधांची माहिती दिली. तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य व अन्य व्यसनांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जाणीव करुन दिली.
टीबी हारेगा देश जितेगा, ‘दोन आठवडे खोकला? टीबी तपासणी करा!’, ‘नशा सोडा, जीवन जोडा’, ‘तंबाखूला नकार, आरोग्याला होकार’ अशा घोषवाक्यांच्या फलकांनी लक्ष वेधून घेतले.
उपजिल्हा रुग्णालयचे समुपदेशक तुषार माळी,,प्रयोगशाळा तंत्रज्ञ डॉ .सतीश पाटील, क्षयरोग पर्यवेक्षक,संजय पाटील,स्मिता पाटील,यांनी विद्यार्थ्यांना उपस्थितांना माहिती दिली.
यासोबत नशामुक्ती अभियानाच्या माध्यमातून तंबाखू, गुटखा, सिगारेट व इतर व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व सांगत युवकांनी समाजामध्ये आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मान्यवारांनी सांगितले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. धेडे, 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम नलावडे, डॉ. आर. बी. पाटील, सायन्स विभागाचे समन्वयक वैभव बुढढे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे सर्व विद्यार्थी व ए. एन.ओ. कॅप्टन डॉ. जयंती गायकवाड, कॅप्टन डॉ. सुधाकर खोत व लेफ्टनंट आर.बी. नाईक, डॉ. राहुल भाट,श्री शिरगावे यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी व शिक्षक वृंद यांनी विशेष कष्ट घेतले.








