
कोल्हापूर , दि. 12 : देश एड्समुक्त करण्यात युवकांची जबाबदारी महत्वाची असून युवकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच समाजाला एड्स मुक्त करण्यात महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात यांनी केले.
१२ ऑगस्ट या आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, रोटरी क्लब ऑफ होरायझन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रेड रन’ मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमूख सहयोग झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, कोल्हापूर यांचा होता.
या स्पर्धेत मुलांमध्ये अभिजित देवकाते तर मुलींमध्ये स्नेहल खरात यांनी प्रथम क्रमांक पटकवीला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे,जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर,जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस, सहाय्यक माहिती संचालक वृषाली पाटील, रोटरी क्लब होरायझनचे प्रेसिडेंट सागर बकरे, कम्युनिटी डायरेक्टर ऍड संदीप पवार हे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.. थोरात म्हणाल्या, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा एड्स नियंत्रण विभागामार्फत महाविद्यालयीन विध्यार्थ्यांसाठी रेड रन ही मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयेजित केली. एच. आय. व्ही. ला रोखण्यासाठी युवकांची जबाबदारी असून, लवकरच नवीन एच. आय. व्ही. संसर्गीतांची आकडेवारी शून्यावर आणायची आहे.एड्स मुक्तीसाठी रोटरी क्लब ऑफ होरायझन, झंवर ग्रुप या सारख्या संस्थांची भूमिका महत्वाची आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धेचेही आयोजन या निमित्ताने केले आहे. येत्या २३ ऑगस्ट रोजी होणान्या राजस्तरीय स्पर्धेची यजमानपदाची जबाबदारी कोल्हापूर जिल्ह्याकडे दिली आहे ही अभिमानाची बाब आहे.
यावेळी रो. विक्रांत कदम, रो. डॉ. सुहास जोशी यांच्या रोटरी गव्हर्नर निवडीसाठी विशेष सत्कार करण्यात आला.
उपस्थितांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली.
सुत्रसंचालन विनायक देसाई यांनी केले, आभार रो. प्रमोद सुर्यवंशी यांनी मानले.
यावेळी जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे,रो. पवन रोचलानी, रो. नामदेव गुरव, मकरंद चौधरी, कपिल मुळे, विनायक देसाई, संदीप पाटील, राजेश गोधडे, दीपक सावंत, संजय गायकवाड, क्रांतिसिंह चव्हाण या सह रोटरी विवध क्लबचे रोटरी सदस्य, विध्यार्थी, खेळाडू इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजेते –
मुले –
अभिषेक देवकाते, नाईट कॉलेज कोल्हापूर, प्रवीण कांबळे राजर्षी शाहू कॉलेज कोल्हापूर, ऋषिकेश माळकर विठ्ठलराव पाटील कॉलेज कळे
मुली –
स्नेहल खरात राजर्षी शाहू कॉलेज कोल्हापूर, सुकन्या शिवणे शिवराज कॉलेज, गडहिंग्लज,विनम्रता पांडे राजर्षी शाहू कॉलेज रूकडी
पहिल्या दोन क्रमांक विजेत्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.








