
कोल्हापूर, दि. 1 :
गोकुळ निवडणूक जवळ येऊ लागलेली आहे तसे वातावरण चांगलेच तापू लागलेले आहे. मंत्री ना. हसन मुश्रीफ, आ. चंद्रदिप नरके, राहुल पाटील यांचे संचालक व कार्यकर्ते काल रात्रीपर्यंत सहाय्यक निबंधक कार्यालयात ठाण मांडून होते. तर अदृश्य शक्ती काल समोर आली. ती अदृश्य शक्ती म्हणजे महाडिक गट आहे हे उघड झाले. महाडिक यांचेही कार्यकर्ते ना. मुश्रीफ, आ. नरके व राहुल पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या काल समोरासमोर आलेले होते.
272 निवडणुकीसाठी पात्र सभासद असलेल्या संस्था अवसायानात काढण्यात आल्या.
325 संस्थांचे प्रतिनिधी अपात्र जे कार्यक्षेत्राबाहेरचे आहेत ), (पण संस्था पात्र असल्यामुळे संस्थेच्या सभासदाच्या नावावर नवीन ठराव द्यावा लागणार.)
148 संस्था प्रतिनिधी पात्र. कर्मचाऱ्यांच्या नावावर ठराव नसावा असा गोकुळचा कोणताही नियम नसल्याने ते प्रतिनिधी पात्र ठरलेले आहेत.
267 संस्था सहाय्यक निबंधकांनी अपात्र ठरविलेल्या आहेत, पण त्या न्यायप्रविष्ठ आहेत. सध्या त्या संस्था मतदार यादीत आहेत.
410 संस्थांवर गोकुळला नियमबाह्य सभासद झाल्या आहेत म्हणून हरकती आहेत, त्या सध्या सहकार न्यायालयात आहेत.
एकूण 1422 पैकी न्यायप्रविष्ठ संस्था सोडून 789 संस्था अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत असे सांगण्यात आले.








