
कोल्हापूर, दि. 14 :
पोलीस दलामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना15 ऑगस्ट च्या पुर्वसंध्येला केंद्र शासनामार्फत पदके जाहीर केली जातात. कोल्हापूर पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले राजेंद्र गोदावरी मनोहर घारगे यांना त्यांच्या पोलीस दलातील अति उत्कृष्ट कामगिरीबद्दल शासनाच्या वतीने ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक ‘ जाहीर झालेले आहे.
राजेंद्र घारगे हे सध्या कोल्हापूर शहर वहातूक विभागात कार्यरत असून यापूर्वी त्यांनी विविध विभागात उत्कृष्ट सेवा बजाविलेली आहे. उपनिरीक्षक घारगे हे कोल्हापूर पोलीसदलाचे नावाजलेले फुटबॉल खेळाडू असून,कोल्हापूर पोलीस फुटबॉल संघांचे नाव देशभर पोहचविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पोलीस फुटबॉल संघांचे ‘कर्णधार’ पदही त्यांनी भूषविलेले आहे.
मेहनत व प्रामाणिकपणे केलेलल्या कामाची पोहच पावती मिळाली असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.








