
कोल्हापूर :
पोटातच कळी खुडणारे रॅकेट अर्थात गर्भपात करणारे रॅकेट दिवसेंदिवस उघडे होऊ लागलेले आहेत. खुद्द आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या जिल्ह्यातच गेल्या काही महिन्यापासून असे प्रकार उघडकीस येत आहेत.
कोल्हापूर येथील कदमवाडी परिसरातील प्रतिमा हॉस्पिटलमध्ये गर्भपात करताना निवृत्त सिव्हील सर्जन डॉ.चंद्रकांत गुंडा गायकवाड याला रंगेहात पकडण्यात आलेले असून डॉ.गायकवाड यांने शेकडो गर्भपात केल्याची शंका उपस्थित होत आहे. डॉ.गायकवाड यांने यापूर्वी सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, बीड इत्यादी ठिकाणी सिव्हिल सर्जन म्हणून सेवा बजावलेली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यानेच अवैद्य गर्भपाताचा धंदा चालविल्याने आरोग्य सेवेला काळीमा फासला जाणारा प्रकार आहे. डॉ. गायकवाड च्या अटकेची प्रक्रिया सुरू असतानाच तब्येत बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे.
अधिक तपास पोलीस करत असून लवकरात रॅकेट उघडे पडण्याची शक्यता आहे.








