
भोगावती : दि. 5
शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे काम करत देशाचे सुजाण नागरिक बनविण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यामुळे देशाच्या प्रगतीत शिक्षकांचा महत्वपूर्ण वाटा असल्याचे गौरवोउद्गार कौलव शालेय व्यवस्थापन समितचीचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी काढले. शिक्षक दिनानिमित्त कौलव ता. राधानगरी येथील शाळेत आयोजित केलेल्या शिक्षकांच्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.
पुढे बोलताना भगवान पाटील म्हणाले,अशा शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे समाजाचे कर्तव्य आहे.कौलव शाळेच्या यशस्वी वाटचालीमध्ये शाळेतील शिक्षकांचा महत्वाचा वाटा आहे .त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना पालकांना अभिमान वाटतो. ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती हातात हात घालून शाळेच्या विकासासाठी भरीव योगदान देत असून भविष्यातही शाळेच्या विकासासाठी काठीबद्ध आहोत.
या वेळी सर्व शिक्षकांना सन्मानपत्र , फेटा व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.या सत्कारामुळे सर्व शिक्षक वृंद भारावून गेला .
कार्यक्रमाला सरपंच एकनाथ कुंभार,ग्रामपंचायत सदस्य रणजीत पाटील,अजित पाटील,संदीप चरापले,सुरज पाटील,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अभिजीत पाटील, सदस्य प्रवीण हुजरे,संगीता कलीकते,प्रदीप पाटील, संजीवनी पाटील,निवास पाटील,अध्यापक राम चौगुले, श्रीराम बडे,आशा बर्गे,रुपाली मगदूम,वैशाली पाटील,मीनाक्षी पवार यांच्यासह पालक व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत शाहू चौगुले ,प्रास्ताविक आर.जी.पाटील तर आभार अनिल सुतार यांनी मानले. सूत्रसंचालन संदीप मगदूम यांनी केले.








