
जिल्हा बँकेसाठी धैर्यशील पाटील कौलवकरांचे रणशिंग
भोगावती :
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने संस्था प्रतिनिधीच्या नावे ठराव जमा करण्याच्या कामाने अंतिम टप्पा गाठलेला आहे. बँकेवर ना. हसन मुश्रीफ यांची सत्ता आहे.
भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक, राधानगरी तालुक्याचे नेते धैर्यशील पाटील – कौलवकर यांनी राधानगरी येथे कार्यकर्त्यांसह ठराव जमा केलेले आहेत. ते जिल्हा बँकेसाठी जोरदार इच्छुक असून स्वतः अथवा पत्नी रुपालीदेवी पाटील पाटील यांच्यासाठी ते फिल्डिंग लावत आहेत. राष्ट्रवादीचे नेते ना. हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील जो आदेश देतील त्या गटातून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.







