
कौलव :
आषाढी एकादशीनिमित्य कौलव केंद्रशाळेच्या वतीने पालखी सोहळा व दिंडीचे आयोजन करण्यात आले.वारकरी वेशातील चिमुकले,विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा करुन आलेले विद्यार्थी,टाळ मृदंगाचा ठेका व हरीनामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात दिंडी शाळेपासून गावातील मारुती देवालया पर्यंत काढण्यात आली.दिंडीच्या वाटेवर फुगडी आणि वारकरी चालीचा ठेका धरण्यात आला. दिंडीमध्ये पालक व ग्रामस्थानी सहभागी होऊन आनंद घेतला.ग्रामपंचायत कौलवच्या वतीने विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आले.लाडू वाटपही करण्यात आले. या दिंडीमुळे गावातील वातावरण भक्तिमय झाले होते. दिंडी सोहळ्यात सरपंच एकनाथ कुंभार,ग्रामपंचायत सदस्य रणजित पाटील,अजित पाटील,संदीप चरापले, सुरज पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शांताराम पाटील, विशाल बनछोडे, दिलीप यादव, अमृता पाटील,मुख्याध्यापक आर. जी. पाटील, शाहू चौगले संदीप मगदूम, राम चौगले अनिल सुतार, श्रीराम बडे, आशा बरगे, रुपाली मगदूम, वैशाली पाटील, मिनाक्षी पोवाळकर यानी दिंडीच्या यशस्वीतेसाठी कष्ट घेतले








