कोल्हापूर,
सायबर महाविद्यालयाच्या दिनकरराव शिंदे समाजकार्य विभाग येथे सी. पी. आर. हॉस्पिटलच्या वतीने महाविद्यालय संवेदीकरण या उपक्रमांतर्गत संवाद साधताना वरिष्ठ समुपदेशक श्री मकरंद चौधरी यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध माहिती देऊन त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर दिली. आज देखील एच.आय.व्ही., एड्स बद्दल समाजात उदासीनता व भेदभावपूर्ण वातावरण दिसून येते.हे चित्र बदलण्यासाठी महाविद्यालयीन तरुणांनी इन्फॉर्मेशन,एज्युकेशन आणि कम्युनिकेशन या तत्त्वानुसार जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रतिबंधात्मक उपायांबाबत सविस्तर माहिती पोहोचविण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे आयोजन डॉ.दीपक भोसले यांनी केले. याप्रसंगी समाजकार्य विभागाचे अधिष्ठाता डॉ.टी.व्ही. जी.शर्मा, प्रा. शिवानी गावडे,प्रा. संध्या तळेकर उपस्थित होते. आभार विध्यार्थी प्रतिनिधी अश्विनी सपकाळ यांनी मानले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.








