कोल्हापूर, दि. 27 :
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लि. सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत किर्लोस्कर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ च्या उद्घाटन प्रसंगी बोलताना कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योजिका मोनिका मोहिते यांनी वरील उद्गार काढले.
आपल्या सेंद्रिय शेती उत्पादनाचे दाखले देत येणाऱ्या काळात सेंद्रीय उत्पादनाशिवाय आरोग्य राखणे अशक्य आहे.सेंद्रिय शेतीबद्दल गैरसमज मोठ्या प्रमाणात असून सेंद्रिय उत्पादने महाग आहेत असा गैरसमज आहे. सेंद्रिय उत्पादनासाठी अधिकची मेहनत व कष्ट घ्यावे लागत असून या उत्पादनासाठी आकारले जाणारी किंमत ही रास्त असते. माणूस औषध गोळ्या व इतर गोष्टींसाठी अनावश्यक खर्च करत असतो परंतु जीवनावश्यक आरोग्यदायी गोष्टींसाठी काटकसर केली जाते. दुर्दैवाने शेती व शेतकरी या दोन्ही गोष्टीला समाजात प्रतिष्ठा मिळत नसल्याने उदासीनता पाहायला मिळते. खरंतर शेती उत्पादनाशिवाय माणसाचं जगणं सुसह्य होऊ शकत नाही.त्यामुळे अशा प्रकारच्या पर्यावरणीय चित्रपट महोत्सवातून पर्यावरण रक्षणाचे संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे प्रतिपादनत्यांनी केले.
चित्रपट महोत्सवाची सुरुवात रोपाला पाणी घालून करण्यात आली.
प्रास्ताविकात सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजगेकर यांनी या दोन चित्रपट महोत्सवाचा उद्देश स्पष्ट करताना अशा महोत्सवा मधून जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
सायबरचे संचालक डॉ. आर.के. टेलर यांनी सायबर महाविद्यालय राबवीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर किर्लोस्कर कंपनीचे साईड लीडर सुरेश मगदूम यांनी किर्लोस्कर कंपनी ही शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
मानव संसाधन अधिकारी हरीश सायवे यांनी तरुणांनी पर्यावरण जागृती बाबत दक्ष असणे गरजेचे असून त्यांच्याशिवाय पर्यावरण संवर्धन त्यांच्या कृतिशील उपक्रमाने शक्य असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ. टी. व्ही. जी शर्मा,शाश्वत विकास मंचाच्या डॉ. पूजा पाटील,लक्ष्मी फौंडेशनचे अध्यक्ष विनायक देसाई,विविध विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. पूनम माने व प्रा.महेंद्र जनवाडे यांनी केले तर आभार समन्वयक प्रा.डॉ.दीपक भोसले यांनी केले.
दिवसभर चाललेल्या सत्रात सुमारे १२ पर्यावरणीय माहितीपट दाखवण्यात आले. पर्यावरणावर आधारित रील मेकिंग, फोटो कॉम्पिटिशन,स्लोगन,, फेस पेंटिंग,कविता आणि पर्यावरणीय नाविन्य उपक्रम सादरीकरण स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धांमध्ये सुमारे ५० विद्यार्थी विद्यार्थिनीनी सहभाग नोंदविला.
महोत्सवाच्या आजच्या सत्रात डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या डॉ. शिंपा शर्मा, चिदंबर शिंदे, तेजस झगडे, सागर चौगुले इत्यादींचे व्याख्यान व कार्यशाळा होणार असून समारोपीय सत्रात पाहुण्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात पर्यावरणावर काम करणारे रोहित व रक्षिता बनसोडे या बहिण भावंडांचा पर्यावरणीय योगदानाबद्दल पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोहन तायडे, अन्वर फकीर, रितेश कांबळे, प्रा. अनघा खत्री, प्रा. ऋतुजा माळी, इत्यादींचे सहकार्य लाभले.







