कोल्हापूर दि. २९
गोकुळ दुध संघाची निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तश्या अनेक राजकीय घडामोडी होऊ लागलेल्या आहेत. काँग्रेस नेते आ. सतेज पाटील अंडर करंट देण्याच्या तयारीत आहेत.
गोकुळ दुध संघाच्या चेअरमन पदासाठी ज्यांचे नाव पुढे यायचे ते कसबा बीड येथील स्व. सुरेश पाटील हे पी. एन. पाटील यांचे सरसेनापती व जिवलग मित्र होते. सुरेश पाटील म्हणजे पी. एन. पाटील असा सिरस्ता होता.स्व. सुरेश पाटील यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचे चिरंजीव सत्यजित पाटील यांना गोकुळ मध्ये संचालक पदावर घेतले गेले. गेल्या निवडणुकीत सुद्धा सत्यजित पाटील हे स्व.आ.पी. एन. पाटील गटाचे उमेदवार होते परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. गोकुळ निवडणूकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार नाही हे गृहीत धरून कसबा बीडचे माजी सरपंच व राहुल पाटील यांचे निष्ठावंत शिलेदार सत्यजित पाटील हे आज सायंकाळी अजिंक्यतारावर काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. हा राहुल पी. एन. पाटील यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे.सत्यजित पाटील यांच्या प्रवेशाने आ.सतेज पाटील यांना मात्र बळ मिळणार आहे.स्व.सुरेश पाटील यांच्यानंतर सत्यजित पाटील यांना मानणारा एक वर्ग या परिसरात आहे. आगामी काळात आ. सतेज पाटील हे जिल्ह्यात किती राजकीय हादरे हे पहावे लागणार आहे.








