चंदगड,
मुले वयात येताना, किशोर अवस्थेमध्ये योग्य व चांगल्या मित्रांच्या सहवासाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालय चंदगडचे समुपदेशक विनायक देसाई यांनी केले. चंदगड येथील शालेय मुलांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.वैद्यकीय अधीक्षक डॉ. रश्मी माळगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.
पुढे बोलताना ते म्हणाले, की किशोरावस्थेमध्ये मुलांमध्ये शारीरिक व भावनिक बदल होत असतात. मुलांमध्ये सहकाऱ्यांचा प्रभाव जास्त पडत असतो.काहीवेळा पालकांचे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.मित्र – मैत्रिणींचा प्रभाव या वेळी फार महत्वाचा ठरतो. वाईट मित्रांच्या सोबत, मोबाईल वरील अपुरी माहितीमुळे मुले चुकीच्या मार्गाकडे वळण्याचा धोका अधिक असतो. हल्ली मुलांमध्ये मोबाईलचा वापर मोठया प्रमाणात वाढलेला असल्यामुळे कोणतीही माहिती त्यांना सहज मिळते.
असुरक्षित लैंगिक संबंध,ड्रग्ज सारख्या पदार्थांचे विभागून सेवन करताना एकाच सुईचा सर्वांमध्ये वापर केल्यास,एखादा एच. आय. व्ही. संसर्गीत असल्यास इत्तरांना होणारा एच. आय. व्ही. संसर्ग धोकादायक ठरु शकतो.
यासाठी मुलांनी योग्य मित्र- मैत्रिणी निवडणे,पालक व शिक्षक यांच्या सुचनांचे पालन करुन योग्य माहिती मिळविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी विध्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.








