कोल्हापूर,
आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त केंद्र शासन व राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था नवी दिल्ली यांच्या वतीने पटना,बिहार येथे आयोजित केलेल्या रेड रन मॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी कोल्हापूरची कन्या स्नेहल खरात हिने देशात प्रथम क्रमांक मिळवीला. कोल्हापूरचीच सुकन्या शिवणे हिने सातवा क्रमांक मिळवीला. मुलांमध्ये सुद्धा कोल्हापूरचा प्रवीण कांबळे याने देशात पाचवा क्रमांक मिळवीला.
एड्स जागृतीचा भाग म्हणून राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेमध्ये देशातून सुमारे दोनशे स्पर्धक झाले होते. ही स्पर्धा 10 किमी अंतराची होती.संघ व्यवस्थापक म्हणून कोल्हापूर जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकरसोबत होत्या.
स्पर्धेतील विजेती स्नेहल खरात व सहकाऱ्यांचे नुकतेच कोल्हापूरात आगमन झाले.हलगी, घुमक्याच्या कडकडाडात एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांनी विजेत्यांचे जंगी स्वागत केले.
विजेत्यांनी दसरा चौक येथील छ. शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, मेडिकल कॉलेजच्या प्रा. डॉ.संगीता कुंभोजकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांच्या हस्ते स्नेहल व विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
मुलगा मुलगी भेदभाव न करता मुलगी सुद्धा घराण्याचे नाव उज्वल करु शकते हे स्नेहलने दाखवून दिलेले असून तीने कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राची मान देशामध्ये उंचावली असल्याचे गौरवोउद्गार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात यांनी काढले. जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेदरम्यानचा अनुभव सांगितला.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबईचे प्रकल्प संचालक डॉ. सुनील भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे अधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील एड्स नियंत्रण कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.








